क्राईम

नांदेड परिक्षेत्रात मोठी कारवाई : गुटखा, अंमली पदार्थ व शस्त्रांविरोधात 131 गुन्हे; 94 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड : सध्या सुरू असलेल्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्रात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत गुटखा, अंमली पदार्थ व घातक शस्त्रांविरोधात विशेष मोहिम राबवली. दिनांक 11 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत पार पडलेल्या या मोहिमेत एकूण 131 गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे 94.13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत गुटखा प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 123 अंतर्गत 34 गुन्हे, अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत 5 गुन्हे, तसेच शस्त्र अधिनियमान्वये 92 गुन्हे नोंदविण्यात आले.

या कारवाईदरम्यान आरोपींकडून 57.48 लाख रुपयांचा गुटखा व इतर साहित्य, 15.87 लाख रुपयांचा गांजा व एक वाहन, तसेच 20.77 लाख रुपयांच्या किंमतीची 4 गावठी पिस्तुले, 12 काडतुसे, तलवारी, खंजिर व इतर धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली.

परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांत ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. विविध पोलीस ठाणी व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, अवैध व्यवसायांबाबत नागरिकांकडून थेट माहिती मिळावी यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन (91 50 100 100) सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे गोपनीय माहिती पोलीसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *