महाराष्ट्रा

प्रवाशांच्या सुविधेसाठी तपोवन एक्सप्रेस व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे

 

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच प्रवासाची सुविधा वाढविण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड विभागातील दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये कायमस्वरूपी दोन अतिरिक्त सामान्य श्रेणी (GS) डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार खालील गाड्यांमध्ये प्रत्येकी २ सामान्य श्रेणीचे डबे वाढविण्यात येणार असून गाडीची रचना १८ डब्यांवरून २० डब्यांची करण्यात येणार आहे.

१) गाडी क्र. 17618/17617 हजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हजूर साहिब नांदेड तपोवन एक्सप्रेस
या गाडीमध्ये दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत.
• हजूर साहिब नांदेड येथून प्रभावी दिनांक: 29 एप्रिल 2026
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रभावी दिनांक: 30 एप्रिल 2026

२) गाडी क्र. 17688/17687 धर्माबाद – मनमाड – धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस
या गाडीमध्ये दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत.
• धर्माबाद येथून प्रभावी दिनांक: 28 एप्रिल 2026
• मनमाड येथून प्रभावी दिनांक: 28 एप्रिल 2026

या कायमस्वरूपी वाढीमुळे प्रवाशांसाठी अधिक आसन क्षमता उपलब्ध होणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येते.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *