क्राईम

गोदावरी नदीपात्रात अवैध रेती उपशावर धडक कारवाई; 25.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : अवैध रेती उपसा व वाहतूक रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उपसा ठिकाणांवर छापा टाकला. या कारवाईत एकूण 25,25,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पाच अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर (पो.स्टे. नांदेड ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली 28 एप्रिल 2026 रोजी पहाटे पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार मौजे गंगाबेट परिसरातील गोदावरी नदीपात्रात इंजिन व तराफ्यांच्या साहाय्याने अवैध रेती उपसा सुरू असल्याचे समजताच पोलिसांनी पहाटे सुमारे 3.50 वाजता छापा टाकला. पोलिसांना पाहताच रेती उपसा करणारे पाच अनोळखी आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :

पाण्यात तरंगणारे 20 तराफे (प्रत्येकी 50,000 रुपये) – एकूण 10,00,000 रुपये
रेती उपसा करणारी 5 इंजिने (प्रत्येकी अंदाजे 3,00,000 रुपये) – एकूण 15,00,000 रुपये अंदाजे 5 ब्रास रेती – 25,000 रुपये

एकूण जप्त मुद्देमाल : 25,25,000 रुपये नदीपात्रातील तराफे व इंजिने बाहेर काढणे शक्य नसल्याने पंचांसमक्ष ते जाळून, तोडून व बुडवून नष्ट करण्यात आले. तसेच नदीकिनारी साठवून ठेवलेली रेती जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
या प्रकरणी अनोळखी पाच आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 48(7), 48(8), पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9 व 15 आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3, 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *