मिलन वेल्फेअर सोसायटी, नांदेडतर्फे 15 सामूहिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन

नांदेड (प्रतिनिधी – मुनव्वर खान) : दिनांक 3 मे 2026, रविवार रोजी सकाळी 10 वाजता नूरी चौक येथील बी.के. फंक्शन हॉलमध्ये मिलन वेल्फेअर सोसायटी, नांदेड यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 24व्यांदा 15 सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
या प्रसंगी निकाह व इजाब-ओ-कबूलची कार्यवाही हाफिज व काजी मोहम्मद रफीक यांनी उत्तमरीत्या पूर्ण केली. निकाहपूर्वी मुफ्ती सय्यद शफीउद्दीन कासमी आणि मौलाना साद अब्दुल्ला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना निकाहचे धार्मिक महत्त्व, पती-पत्नीचे अधिकार व कर्तव्ये तसेच विवाह सोहळे सुलभ करण्याची गरज यावर सविस्तर भाष्य केले. तसेच मिलन वेल्फेअर सोसायटीच्या गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करून पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
खुतबा-ए-निकाह मौलाना तैयब यांनी वाचून दाखवला, तर कार्यक्रमाची सांगता मौलाना साद अब्दुल्ला यांच्या दुआने झाली. या सामूहिक विवाह सोहळ्यात नवदांपत्यांसह त्यांच्या नातेवाईक व पाहुण्यांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित राहून नवविवाहित जोडप्यांना तसेच सोसायटीच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मिलन वेल्फेअर सोसायटीतर्फे नवदांपत्यांना जीवनावश्यक वस्तू जसे की पलंग, गादी, कपाट, कूलर व इतर साहित्य भेट देण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष हाजी बाबू खान सत्तार खान, हाजी महमूद खान, मोहम्मद सफदर, हाजी मोहसिन चावूस, मोहम्मद याकूब, हाजी मोहम्मद अमीन, शेख सलीम, सय्यद इमरान, शेख अहमद, हाजी सय्यद कय्यूम अली, हाजी गौस मोहिउद्दीन, शेख जलील, शेख मुबीन, अब्दुल मुकीत, मोहम्मद अब्दुल रशीद, शेख अहमद चावूस, फिरोजभाई, शेख नदीम, शेर खान, अयूब खान, शेख शकील, बशारत खान तसेच सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.



