दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन गाड्यांची सुरूवात

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी विविध विशेष गाड्यांना नियमित करून नवीन गाड्यांची सुरूवात तसेच विद्यमान गाड्यांमध्ये विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनुसार खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत:
1) नांदेड – तिरुचानूर – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस (17633/17634) नियमित सुरु :
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, पूर्वी चालविण्यात येत असलेल्या स्पेशल गाडीचे (07015/07016) नियमितीकरण करून ती आता नांदेड – तिरुचानूर – नांदेड दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे.
•गाडी क्र. 17633 (नांदेड – तिरुचानूर) : दर शनिवारी, प्रारंभ दिनांक 09 मे 2026, प्रस्थान 16:45 वाजता
•गाडी क्र. 17634 (तिरुचानूर – नांदेड) : दर रविवारी, प्रारंभ दिनांक 10 मे 2026, प्रस्थान 19:45 वाजता
ही गाडी नांदेड, मुदखेड, निजामाबाद, वारंगल, विजयवाडा, नेल्लोर, रेनीगुंटा आदी महत्त्वाच्या स्थानकां मार्गे धावणार आहे .
०२) जालना – तिरुचानूर – जालना साप्ताहिक एक्सप्रेस (17637/17638) नियमित सुरू :
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, पूर्वी चालविण्यात येत असलेल्या स्पेशल गाडीचे (07609/07610) नियमितीकरण करून ती आता जालना – तिरुचानूर – जालना दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे.
गाडी क्र. 17637 (जालना – तिरुचानूर) : दर सोमवारी, प्रारंभ दिनांक 11 मे 2026, प्रस्थान 07:00 वाजता
गाडी क्र. 17638 (तिरुचानूर – जालना) : दर मंगळवारी, प्रारंभ दिनांक 12 मे 2026, प्रस्थान 15:15 वाजता
ही गाडी परभणी, लातूर रोड, विकाराबाद, गुंटूर, रेनीगुंटा आदी स्थानकां मार्गे धावणार आहे.
03) पूर्णा – जालना – नांदेड डेमू पॅसेंजर (77623/77624) नियमित सुरु :
प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, पूर्वी चालविण्यात येत असलेल्या स्पेशल गाडीचे (07281/07282) नियमितीकरण करून ती आता दैनंदिन पूर्णा – जालना – नांदेड डेमू पॅसेंजर सेवेत रूपांतरित करण्यात आली आहे.
गाडी क्र. 77623 (पूर्णा – जालना) : दररोज, प्रारंभ दिनांक 04 मे 2026, प्रस्थान 21:00 वाजता
गाडी क्र. 77624 (जालना – नांदेड) : दररोज, प्रारंभ दिनांक 05 मे 2026, प्रस्थान 23:00 वाजता
ही डेमू गाडी परभणी, सेलू परतूर मार्गे धावणार असून स्थानिक प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
04) नांदेड – रायचूर -परभणी एक्सप्रेस (17663/17664) जालना पर्यंत विस्तारीत : प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून, विद्यमान नांदेड -रायचूर –परभणी एक्सप्रेसचा जालना पर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
गाडी क्र. 17663 (रायचूर – जालना) : दररोज, विस्तार लागू दिनांक 05 मे 2026, प्रस्थान 15:50 वाजता
गाडी क्र. 17664 (जालना – रायचूर) : दररोज, विस्तार लागू दिनांक 06 मे 2026, प्रस्थान 17:30 वाजता
या विस्तारामुळे परभणी, सेलू, परतूर मार्गावरील प्रवाशांना थेट रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
05) या बदलामुळे गाडी क्र. 57659 परभणी – नांदेड पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.



