गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड तर्फे दिनांक 2-3 मे 2026 रोजी 71 वा सामुहिक विवाह महोत्सव संपन्न

सामाजिक परिवर्तनाची बांधिलकी म्हणून गुरुद्वारा सचखंड बोर्डातर्फे दरवर्षी सामुहिक विवाह मेळावे (मे व डिसेंबर) महिण्यांत आयोजित करण्यात येतात. आता पर्यंत एकुण 70 विवाह मेळावे संपन्न झाले आहेत. यामध्ये जवळ-जवळ 2400 हुन अधिक जोपड्यांचे) विवाह गुरुद्वारा बोर्डातर्फे करण्यात आले आहेत. यावर्षीही 2-3 से 2026 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजता श्री गुरु ग्रंथ साहिब जी भवन येथे माननिय पंजप्यारे साहिबान व इतर प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितित संपन्न झाला. यामध्ये देशातल्या विविध भागातुन सामुहिक विवाह मेळाव्यात विवाह बध्द होण्यासाठी 13 जोडपी सामिल झाली.
यावेळी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक स. विजय सतबीर सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा विवाह महोत्सव संपन्न करण्यात आला. विशेष करुन यावेळेस तीव्र उन्हाळा असल्यामुळे जागोजागी पाण्याचे स्टॉल, लंगर हॉल मध्ये कुलर व पंखे, तसेच दशमेश हॉस्पीटलच्या संपूर्ण स्टाफ ला तत्पर राहण्यास सांगितले होते. हा विवाह महोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा घेण्यात याव्यात अशा सुचना देखील केल्या. मा. प्रशासक साहेब या कार्यक्रमाध्ये उपस्थित राहू शकत नसल्यामुळे त्यांनी आपले संदेश पाठविले ज्यामध्ये नव दामपत्यांस भावी जीवनाच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थि आणि प्रतिष्ठीत नागरिक यांचा विशेष सत्कार करण्यात आले. हा सत्कार कार्यक्रम माननिय पंजप्यारे साहिबान यांच्या हस्ते व गणमान्य व्यक्तिच्या उपस्थितीत संपन्न झाला.
71 व्या सामुहिक विवाह मेळाव्यात संत बाबा बलविंदर सिंघ जी कारसेवा वाले (गुरुद्वारा लंगर साहिब), संत बाबा तेजा सिंघ जी (मुखी गुरुद्वारा माता साहिब), आजी माजी सदस्य, नांदेड दक्षिण आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या सुपत्नी यांच्या तर्फे नवदाम्पत्यास शुभेच्छा भेट देण्यात आली, नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठीत नागरिक तसेच हैद्राबाद, करीमनगर, बीदर, औरंगाबाद, जालना, परभणी, खामगांव, मुर्तिजापुर, धानोरा (शीख) अशा अनेक ठिकाणची वन्हाड मंडळी शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होती.
यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे अधिक्षक स. रविन्दर सिंघ कपुर यांच्या मार्गदर्शनाखाली व स. जैमल सिंघ ढिल्लो सहा. अधिक्षक व स. बलविन्दर सिंघ फौजी सहा. अधिक्षक तसेच स. विक्रमजीत सिंघ कलमवाले मेळावा विभाग, स. जसबीर सिंघ शाहू लंगर इंचार्ज, स. हरपाल सिंघ शिलेदार सि.एस.ओ., कार्यक्रमाचे सुत्र संचलन स. गुरबचन सिंघ शिलेदार – प्रिन्सीपल हजूर साहिब आय.टी.आय., खालसा हायस्कुल चे मुख्याध्याक स. चांद सिंघ, सचखंड पब्लीक स्कुल ची प्रिन्सीपल श्रीमती अनिलकौर खालसा, श्रीमती बबीताकौर चाहेल – पी.ए., लेखापाल – स. सतविंदर सिंघ रामगडीया, रोखपाल स. परविन्दर सिंघ वासरीकर, स. सतनाम सिंघ रागी इंचार्ज खेती, तसेच गुरुद्वारा बोर्डाचे सर्व विभाग प्रमुख व संपूर्ण स्टाफ ने आपली सेवा दिली व गुरुद्वारा लंगर साहिबचे 100 सेवादारांनी विशेष सेवा प्रदान केली.



