“ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत नांदेड पोलिसांची इस्लापूर परिसरात मोठी संयुक्त कारवाई-
ग्रामीण भागातील दारूमुळे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम

नांदेड जिल्हा पोलीस दलामार्फत ग्रामीण भागामध्ये अवैध दारू निर्मिती, विक्री व त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाउन” अंतर्गत आज दिनांक 3/5/26 रोजी पोलीस स्टेशन इस्लापूर हद्दीतील मौजे शिवनी व आजूबाजूच्या दुर्गम परिसरात मोठ्या प्रमाणावर नियोजनबद्ध व समन्वयातून विशेष कारवाई करण्यात आली.
सदर गावामध्ये हातभट्टी दारू निर्मितीची प्रवृत्ती पूर्वीपासून आढळून येत असल्याने, या परिसराचा सखोल अभ्यास करून अत्यंत गोपनीय व काटेकोर नियोजनाद्वारे पहाटे 4.00 वाजल्यापासून ही मोठी कारवाई सुरू करण्यात आली.
या संयुक्त कारवाईमध्ये Islapur PS तसेच बाहेरून 1 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 10 अधिकारी, 105 पोलीस अंमलदार तसेच 2 RCP प्लाटून यांनी सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला—
* हातभट्टी दारूचे 22 गुन्हे दाखल
* मोहमास सडवा – 17,250 लिटर अंदाजे किंमत ₹8,62,500/-
* हातभट्टी दारू – 166 लिटर अंदाजे किंमत ₹16,000/-
* मोहफुले – 1,500 किलो अंदाजे किंमत ₹45,000/-
* रसायनमिश्रित सिंधी – 2 गुन्हे, 2,700 लिटर अंदाजे किंमत ₹54,000/-
* गुटखा संदर्भात 1 कारवाई किंमत ₹48,840/-
अशाप्रकारे एकूण अंदाजे ₹10,26,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याशिवाय अवैध वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्याची कार्यवाहीही सुरू आहे.
सदर प्रकरणात आतापर्यंत एकूण 25 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या कारवाईदरम्यान गावातील अनेक नागरिक तसेच महिला भगिनींनी पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सकारात्मक सहभागाबद्दल नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करते.
नांदेड जिल्हा पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, अंमली पदार्थ (NDPS), अवैध दारू, Arms, जुगार तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांबाबत कोणतीही माहिती असल्यास ती आपल्या स्थानिक पोलीस ठाण्यास किंवा 112 helpline वर तात्काळ कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.



