जिला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नांदेड | दि. ५ मे २०२६ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार) नांदेड जिल्हा अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने मंगळवार, दि. ५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नांदेड शहरातील कदम हॉस्पिटल येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.

या बैठकीस प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. मुजाहिद खान यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सचिव तथा नांदेड जिल्ह्याचे निरीक्षक सय्यद साबीर अली इनामदार यांचा दौरा होणार आहे.

यावेळी अल्पसंख्यांक सेलचे शहर जिल्हाध्यक्ष शफी उर रहमान यांच्या नेतृत्वाखाली नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नियुक्त करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे –
उपाध्यक्ष : म. अय्युब म. सुलेमान (गणीमपुरा, हताई, नांदेड)
उपाध्यक्ष : मोहम्मद अरसलाम अहमद (लेबर कॉलनी, उमर फारुख मशिदीजवळ, नांदेड)
सरचिटणीस : शेख वाजीद शेख गालीब (मोमीनपुरा, करबला रोड, नांदेड)
सरचिटणीस : मोहम्मद जकी मोहम्मद सरवर (मकदूक नगर, नवी आबादी, नांदेड)
चिटणीस : रहीम खान अहमद खान (करबला रोड, नांदेड)
सचिव : अब्दुल शफीक अब्दुल रफीक (चौफाळा, नांदेड)
सचिव : सय्यद नईमोद्दीन सय्यद अलीमोद्दीन (लेबर कॉलनी, शिवाजी नगर, नांदेड)
कार्यकारिणी सदस्य : मोहम्मद जमील मोहम्मद करीमोद्दीन (इस्लामपुरा, नांदेड)

या वेळी मान्यवर तातेराव पाटील आलेगावकर, प्रकाश मुराळकर (माजी नगरसेवक)
डॉ. मुजाहीद खान अल्पस. प्र. कार्यध्यक्ष, युनुस खान शहर सचिव, फशा खान तांबोळी शहर सरचिटणिस, मारोती चिवळीकर सा.न्या शहर जिल्हा अध्यक्ष, मनविर सिंघ युवक शहर जिल्हा, शेख फैसल विध्यार्थी शहर जिल्हा अध्यक्ष, डॉ यतश्याम खुरेशी अल्पसंख्याक शहर अध्यक्ष, शेख रहमत सर अल्पसंख्याक शहर ग्रा. अध्यक्ष, उपस्तित होते

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *