मराठवाडा

MPSC PSI निकालात नांदेडचा झेंडा उंच -16 उमेदवारांची दमदार निवड

नांदेड | प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल 30 एप्रिल 2026 रोजी जाहीर झाला असून, नांदेड जिल्ह्यातील 16 उमेदवारांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या भरती प्रक्रियेत 10 डिसेंबर 2023 रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला राज्यभरातून सुमारे 28 हजार पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 7 हजार उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. मुख्य परीक्षा 29 डिसेंबर 2024 रोजी पार पडली.

मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार 2400 उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात आले. ही शारीरिक चाचणी 15 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान नवी मुंबई येथे घेण्यात आली. मुख्य परीक्षा (300 गुण) आणि शारीरिक चाचणी (100 गुण) अशा एकूण 400 गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. यातून राज्यभरातून 615 उमेदवारांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. नांदेड जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांनी मेहनतीच्या जोरावर यश मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

नांदेड जिल्ह्यातील निवड झालेले उमेदवार व त्यांची रँक पुढीलप्रमाणे :

क्र. नाव नेमणूक रँक
1 आमेर हमीद शरीफ पोलीस ठाणे रामतीर्थ 50
2 विक्रम जळबाजी वानखेडे महामार्ग केंद्र देगलूर 150
3 राहुल देविदास राठोड पोलीस मुख्यालय 201
4 बापू गंगाधरराव भुसावळे पोलीस मुख्यालय नांदेड 226
5 संजय लिंगुराम च्यापलवार LCB नांदेड 250
6 माधव शिवाजी जुन्ने शहर वाहतूक शाखा, वजीराबाद 323
7 सुरज सुधाकर कुबडे QRT 348
8 ज्ञानेश्वर नामदेव डुकरे पोलीस मुख्यालय नांदेड 378
9 सदाशिव अशोकराव बागडे पोलीस मुख्यालय 391
10 बाळू मच्छिंद्र मरेवाड पोलीस स्टेशन मांडवी 403
11 गणेश दिगांबरराव जुन्ने पोलीस मुख्यालय 517
12 वैभव उत्तमराव मुंडे QRT नांदेड 521
13 सतीश गोविंदराव गीते नांदेड ग्रामीण 562
14 अश्विनी किसन राठोड पोलीस ठाणे हदगाव 584
15 श्याम केशव सोनटक्के मोटार परिवहन विभाग नांदेड 592

या सर्व यशस्वी उमेदवारांचे जिल्ह्यातून अभिनंदन होत असून, त्यांच्या या यशामुळे इतर स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना प्रेरणा मिळत आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *