जिला

नांदेड जिल्हा बिल्डिंग मिस्त्री, लेबर गुतेदार कामगार संघटनेचा पहिला कामगार मेळावा उत्साहात संपन्न

 

Nanded : नांदेड जिल्हा बिल्डिंग मिस्त्री, लेबर गुतेदार कामगार संघटनेचा पहिला भव्य कामगार मेळावा आज दि. १२ मे २०२६ रोजी हैदर गार्डन येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून DIG. Shahji Ummap तसेच कामगार आयुक्त Yasmeen Shaikh यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष Sayyad Imran व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

या मेळाव्यात बांधकाम क्षेत्रातील मजूर, मिस्त्री व कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामगारांच्या विविध समस्या, हक्क, सुरक्षा व शासकीय योजनांबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. “हमारा मकसद आपकी सेवा” हा संदेश देत संघटनेतर्फे कामगारांसाठी विविध विशेष लाभांची घोषणा करण्यात आली.

संघटनेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या सुविधा पुढीलप्रमाणे आहेत –

५ लाख रुपयांचे एका वर्षासाठी मोफत जीवन विमा संरक्षण
कामावर दुखापत झाल्यास ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत रोख मदत
दुखापतीमुळे काम करू न शकणाऱ्या कामगारांना १ ते २ महिन्यांचे मोफत रेशन
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व कागदपत्र प्रक्रियेसाठी संपूर्ण मदत
साइटवर मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत

संघटनेत नोंदणी करण्यासाठी १,००० रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून त्यासोबत संघटनेचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. तसेच दरमहा ५० रुपये शुल्क प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत जमा करावे लागणार असल्याची माहिती देण्यात आली.

संघटनेचा पत्ता : ९-७-७८३, उस्मानपुरा, माळटेकडी रोड, ता. जि. नांदेड – ४३१६०४
ऑफिस पत्ता : देगलूर नाका, माळटेकडी रोड, नांदेड. M. 9970797940

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *