महाराष्ट्रा

ओखा–मदुराई विशेष रेल्वे आता नियमित “ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस” म्हणून धावणार

 

पश्चिम रेल्वेने सध्या धावणारी गाडी क्रमांक 09520/09519 ओखा–मदुराई–ओखा विशेष साप्ताहिक रेल्वे नियमित करण्यात आली असून ती आता गाडी क्रमांक 19560/19559 ओखा–तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस म्हणून धावणार आहे. या नियमितीकरणामुळे गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सुलभ, नियमित व सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे.

नियमित गाडी धावण्याचे तपशील:

गाडी क्रमांक 19560 ओखा–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस ओखा येथून 11 मे 2026 पासून (सोमवार) नियमित धावण्यास प्रारंभ करेल. हि गाडी ओखा येथून दर सोमवारी रात्री 23.35 वाजत सुटेल आणि द्वारका, जामनगर, राजकोट, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, बासर, निजामाबाद, काचेगुडा, गडवाल, कर्नुल सिटी, ढोणे मार्गे तिरुपती येथे बुधवारी रात्री 23.30 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 19559 तिरुपती–ओखा साप्ताहिक एक्सप्रेस तिरुपती येथून 14 मे 2026 पासून (गुरुवार) नियमित धावण्यास प्रारंभ करेल. हि गाडी तिरुपती येथून दर गुरुवारी सकाळी 08.15 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच ओखा येथे शनिवारी सकाळी 11.50 वाजता पोहोचेल.

गाडीची रचना: सदर गाडीत पुढीलप्रमाणे एकूण २० डबे असतील –
• १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC-2 Tier)
• ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC-3 Tier)
• १० सामान्य द्वितीय श्रेणी डबे
• ४ शयनयान डबे
• २ जनरेटर-सह सामानवाहू ब्रेक व्हॅन

या गाडीच्या नियमित धावण्यामुळे धार्मिक, पर्यटन, व्यावसायिक तसेच शैक्षणिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. राजकोट, अहमदाबाद, नंदुरबार, भुसावळ, पूर्णा, काचीगुडा आणि तिरुपती यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत रेल्वे चौकशी प्रणालीद्वारे वेळापत्रक व आरक्षण स्थिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *