महाराष्ट्रा

पुणे विभागातील दुहेरीकरण कामामुळे काही गाड्यांच्या मार्गात बदल

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अकोलनेर–अहिल्यानगर –निंबळक या दरम्यान दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत नॉन-इंटरलॉकिंग (NI) काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.
यानुसार खालील गाड्या परिवर्तित मार्गाने धावणार आहेत :

• गाडी क्रमांक 17629 हडपसर –नांदेड एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी दौंड–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–पूर्णा मार्गे धावेल.
• गाडी क्रमांक 17630 नांदेड– हडपसर एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी पूर्णा–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–दौंड मार्गे धावेल.
• गाडी क्रमांक 17323 हुबळी–बनारस एक्सप्रेस ही 15 मे 2026 रोजी सोलापूर–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–छत्रपती संभाजीनगर–मनमाड मार्गे धावेल.

• गाडी क्रमांक 11025 पुणे–अमरावती एक्सप्रेस ही 16, 17 व 18 मे 2026 रोजी पुणे–दौंड–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–पूर्णा–अकोला मार्गे धावेल.
• गाडी क्रमांक 11026 अमरावती–पुणे एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी अकोला–पूर्णा–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–दौंड–पुणे मार्गे धावेल.
• गाडी क्रमांक 12627 बैंगलोर–नवी दिल्ली एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी सोलापूर–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–छत्रपती संभाजीनगर–मनमाड मार्गे धावेल.

• गाडी क्रमांक 20657 हुबळी–निजामुद्दीन एक्सप्रेस ही 15 मे 2026 रोजी सोलापूर–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–छत्रपती संभाजीनगर–मनमाड मार्गे धावेल.
• गाडी क्रमांक 20658 निजामुद्दीन–हुबळी एक्सप्रेस ही 17 मे 2026 रोजी मनमाड–छत्रपती संभाजीनगर–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–सोलापूर मार्गे धावेल.
• गाडी क्रमांक 11410 निजामाबाद–पुणे एक्सप्रेस ही 15, 16 व 17 मे 2026 रोजी जन्कमपेठ –पूर्णा–परभणी–लातूर रोड–कुर्डुवाडी–दौंड मार्गे धावेल.

• गाडी क्रमांक 11409 दौंड–निजामाबाद एक्सप्रेस ही 16 व 17 मे 2026 रोजी दौंड–कुर्डुवाडी–लातूर रोड–परभणी–पूर्णा – जन्कमपेठ मार्गे धावेल.
रेल्वे प्रशासन प्रवाशांना विनंती करते की, प्रवासापूर्वी गाड्यांच्या वेळापत्रकाची व मार्गातील बदलांची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रातून तपासून घ्यावी. यात्रेकरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *