जिला

महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबीरात जन्मनोंद प्रमाणपत्र वितरण

 

लोहा : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबीरात नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना जन्मनोंद प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी तहसिलदार विठ्ठल परळीकर, नगराध्यक्ष शरद पाटील पवार, उपनगराध्यक्ष करीमभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक केशवराव मुकदम, राजू दळवी आदी उपस्थित होते.

शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध शासकीय कागदपत्रांशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्यात आले. तसेच जन्मनोंद प्रमाणपत्रांचे तात्काळ वितरण करून नागरिकांना दिलासा देण्यात आला.

या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. छाया : विनोद महाबळे, लोहा

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *