शिक्षण

विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल करावे – संजय भोसीकर यांचे प्रतिपादन

 

लोहा,15- विद्यार्थ्यांनी उच्च व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊन आपल्या शाळेचे, पालकांचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांनी केले. नेहरू नगर लिंबोटी येथील माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यंदा शाळेचा दहावीचा निकाल 80 टक्के लागला असून 4 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, 11 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर 26 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवून यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक अशोक सापनर यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मनोगत व्यक्त केले.

आश्रम शाळेच्या निकालाची वाढती परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारावे, असे संजय भोसीकर म्हणाले. कार्यक्रमास सरपंच माधवराव वाघमारे, पर्यवेक्षक प्रविण जोगे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी माडगे, शिवा सुरनर, शिवाजी महाराज शेवणकर, सुधीर गित्ते, संभाजी बंडे, भिमाशंकर मलशेट्टे, संगमेश्वर मलशेट्टे, अशोक गित्ते, धनराज मलशेट्टे यांच्यासह पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्तापुरे यांनी तर उपस्थितांचे आभार संगम आंधळे यांनी मानले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *