जिला
महा आवास अभियानात नांदेड जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

सातारा येथे आयोजित महा आवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात नांदेड जिल्ह्यास राज्यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास, कृषी व शेतकरी कल्याण केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हा पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले व माहूरचे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्राम विकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे, मंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व अन्य मान्यवर उपस्थित होते.



