मराठवाडा

नीट परीक्षा निःशुल्क घ्या : डॉ. मुजाहिद खान यांची मागणी.

नांदेड : पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, यापूर्वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांकडून पुन्हा शुल्क आकारू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. मुजाहिद खान यांनी केली आहे.

पेपर फुटीच्या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी यापूर्वीच परीक्षा शुल्क भरलेले असताना पुन्हा शुल्क आकारणे अन्यायकारक ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण वाढू नये तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित परीक्षा प्राधिकरणाने पुनर्परीक्षा पूर्णपणे निःशुल्क घ्यावी, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

डॉ. खान यांनी सांगितले की, पेपर फुटीसारख्या गंभीर प्रकारासाठी विद्यार्थ्यांना जबाबदार धरता येणार नाही. प्रशासनाच्या त्रुटींमुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणाव व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शासन व परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *