मराठवाडा

पद्मशाली मित्र- मंडळ नांदेड तर्फे राज्यस्तरीय पद्मशाली समाज उप-वधू वर परिचय मेळावा नांदेड – 2026 चे आयोजन

(नांदेड ) – नांदेड शहरासह मराठवाड्यामध्ये पद्मशाली समाजात विविध उपक्रम राबविलेल्या तसेच मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक महर्षी मार्कंडेय जयंतीची सुरुवात केलेल्या पद्मशाली युवा- मित्र मंडळ नांदेडची पुर्नस्थापना करण्यात येऊन “पद्मशाली मित्र मंडळ” या नावाने पुनश्च सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार असल्याचे आयोजकांनी बैठकीत मनोदय व्यक्त केला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व हनुमान मंदिर, विनकर कॉलनी, चौफाळा नांदेड येथे रविवारी दिनांक 17 मे रोजी सकाळी पद्मशाली समाजातील नांदेड शहरातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीचे आयोजन पद्मशाली मित्र मंडळ नांदेड यांनी केले होते. या बैठकीमध्ये पद्मशाली समाजातील विविध समस्या व संघटन याबाबत चर्चा करण्यात आली. दिनांक 1 नोव्हेंबर 2026 रोजी मातोश्री मंगल कार्यालय नांदेड येथे पद्मशाली समाजाचा “राज्यस्तरीय उप-वधू वर परिचय मेळावा” आयोजित केल्याचे यावेळी पद्मशाली मित्र मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आले. या निर्णयाचे उपस्थित समाज बांधवांनी स्वागत केले.

अनेक दानशूर समाज बांधवांनी यावेळी आर्थिक देणगी जाहीर केली. बैठकीचे सूत्रसंचालन धनंजय गुम्मलवार यांनी केले तर प्रास्ताविक उमेश कोकुलवार यांनी केले. आभार प्रदर्शन नंदकुमार गाजूलवार व शिवशंकर सिरमेवार यांनी केले. यावेळी श्री गोविंद तुळशीराम कोकुलवार, सुभाषराव बल्लेवार, किशोर राखेवार, गजानन हसनपल्ली, जय नारायण मंचेवार, विजय चरपीलवार, प्राचार्य गोविंद रामदिनवार इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.

मराठवाडा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष श्री गोविंद कोकुलवार तसेच मराठवाडा युनायटेड पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष किशोर राखेवार यांनी मेळाव्यास आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कडक उन्हात सुद्धा बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सुभाषराव बल्लेवार, गोविंद तुळशीराम कोकुलवार, किशोर राखेवार, चंद्रकांत अंकमवार, विजय चरपीलवार, मनोहर चलिंद्रवार, विनोद सुरकुटवार, मनोहर कोकुलवार,प्रकाश तेलेवार, संजय पापणवार, यादव क्यादरवार, व्यंकटेश अमृतवार, जयनारायण मंचेवार, राजू कोकुलवार, जानकीराम पालाकुडतेवार, विजय तालकोकुलवार, राजू वंगरवार, ज्ञानेश्वर गुंडेवार, पिंटू गाजुलवार, गणेश येल्लेवार,

गजानन हसनपल्ली, गणेश बोगेवार,किशन सुरकुटवार, साईनाथ गुडेवार, विनोद गुमलवार, रामदास शेकापुरे, संजय टिपरेसवार, दत्तात्रय चिटकलवार, सुधीर लक्कमवार, चंद्रकांत धसकलवार,महेश बिंगेवार, श्रीनिवास माडेवार, शिवराज दासरवार, शुभम अलसटवार,शिवाजी कोकुलवार,नरसिंग गुरम, गणेश बिंगेवार, गणेश कोकुलवार,चंद्रकांत धसकनवार, केशव नुरेवार,मल्लेश बल्ला, नागेश कोकुलवार, गणेश जिंदम, चंद्रकांत मॅनेटवार, नारायण अलसटवार, माधवराव गुडेवार, दत्ता कोम्पलवार, रवींद्र मोतकुलवार, कालिदास मामीडवार,राजेंद्र हसनपल्ली, संतोष गुमलवार, नागभूषणम सामलेटी इत्यादी सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *