मराठवाडा
आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांना काँग्रेसतर्फे अभिवादन

परभणी दिनांक 27 मे रोजी परभणी शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे आज शनिवार बाजार येथील राजीव भवन येथे आधुनिक भारताचे शिल्पकार, देशाचे पहिले पंतप्रधान व भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास सुहास पंडित, दिगंबर खरवडे , सत्तार पटेल, रवी रत्नपारखे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी पंडित नेहरू यांच्या देशाच्या जडणघडणीत असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.



