जिला
मा.शोभा मुंडे पदोन्नतीने जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड येथे रुजू

नांदेड :- जिल्हा कोषागार अधिकारी या पदावर पदोन्नतीने मा.शोभा मुंडे यांनी नुकताच कार्यभार श्री देशमुख यांच्या कडून घेतला असून नांदेड हिवताप कर्मचारी संघटना व प्रशासकिय आरोग्य कर्मचारी संघटनाचे पदधिकारी यांनी भेट घेवून या वेळी शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच श्री सुभाष राठोड हे ही अप्पर कोषागार अधिकारी म्हणून पदोन्नतीने रुजू झालेले आहेत.
त्यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा कोषागार कार्यालय येथील प्रविण पडलवार, प्रणय मेश्राम, हिवताप कर्मचारी संघटनेचे सत्यजीत टिप्रेसवार, माणीक गिते,चंद्रभान धोंडगे, बालाजी निलपत्रेवार, बालाजी कल्हाळे, प्रशासकिय आरोग्य कर्मचारी संघटनेचे विजय चव्हाण, बालाजी केंद्रे, परमेश्वर मठदेवरु इत्यादी यावेळी उपस्थित होते.



