जिला

तुकाराम मुंढेंना मेल अन् मेडिकलवर FDA ची कारवाई; मुदतबाह्य डायबिटीसच्या गोळ्या विक्रीप्रकरणी खळबळ

 

नांदेड, दि. 15 जून नांदेड शहरातील डॉक्टर लेन परिसरातील एका मेडिकलमधून चक्क मुदतबाह्य डायबिटीसच्या गोळ्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकाने थेट अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना ई-मेलद्वारे तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ कारवाई करत संबंधित मेडिकल चालकाला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे शहरातील मेडिकल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव तालुक्यातील हनुमंत वनाळेकर यांनी आपल्या ९० वर्षीय वडिलांसाठी डॉक्टर लेन येथील तोष्णीवाल मेडिकलमधून डायबिटीसच्या गोळ्यांची खरेदी केली होती. घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलीच्या लक्षात आले की, संबंधित औषधांची मुदत डिसेंबर २०२५ मध्येच संपलेली आहे. यानंतर वनाळेकर यांनी थेट आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली.

तक्रारीची दखल घेत मुंढे यांनी नांदेड अन्न व औषध प्रशासन विभागाला तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तक्रारदाराने पुन्हा संबंधित मेडिकलमधून गोळ्या खरेदी केल्यानंतर सहायक आयुक्त अशोक राठोड यांच्या पथकाने छापा टाकून मेडिकल चालकाला मुदतबाह्य औषधे विक्री करताना पकडले. प्रशासनाने चौकशी करून संबंधित औषधांचा साठा जप्त केला असून मेडिकल तात्पुरते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, संबंधित मेडिकल हे शहरातील मोठे होलसेल मेडिकल म्हणून ओळखले जाते. या प्रकरणामुळे औषध विक्रीतील निष्काळजीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना मेडिकल चालकाचे बंधू अनिल तोष्णीवाल यांनी ही चूक नजरचुकीने झाल्याचे सांगत ग्राहकांची माफी मागितली. “चुकून मुदतबाह्य औषधांचा बॉक्स राहिला होता. भविष्यात अशी चूक होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *