महाराष्ट्रा

तांदूळवाडीजवळ भीषण अपघात : भाविकांची पिकअप विहिरीत कोसळली; ८ ठार, ६ गंभीर

प्रत्यक्षदर्शी इरफान यांची शौर्यपूर्ण मदत; विहिरीत उडी मारून वाचवले जीव

 

 

पंढरपूर, दि. 15 म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या पिकअप गाडीने थेट रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळल्याने ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांचे वाहन म्हसवड-पंढरपूर मार्गावरून जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शी इरफान हे अपघातग्रस्त वाहनाच्या मागून येत होते. त्यांनी सांगितले की, “सुमारे २०० फुटांपासूनच गाडी जोरात हेलकावे घेत होती. चालक गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दूरूनच जाणवत होते. काही क्षणांतच वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत कोसळले.”

अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. इरफान यांनी धाडस दाखवत तात्काळ विहिरीत उडी घेत बचावकार्य सुरू केले. “चार-पाच वर्षांचे एक बाळ पाण्यावर तरंगताना दिसले. क्षणाचाही विलंब न करता मी विहिरीत उडी मारली. त्या चिमुरड्यासह काही जणांना बाहेर काढण्यात यश आले,” असे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले.

दरम्यान, विहिरीला संरक्षणात्मक कठडा असता तर एवढा मोठा अनर्थ टळला असता, अशी खंतही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. या अपघातात मृतांमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.

त्यामुळे परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून “इरफान मुजावर देवदूत ठरला” अशा भावना व्यक्त होत आहेत.अपघातग्रस्त वाहनाच्या मागूनच इरफान मुजावर आपल्या गाडीतून येत होते. त्यांच्या डोळ्यांसमोर पिकअप गाडी विहिरीत कोसळली. घटनेनंतर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गाडी थांबवून थेट विहिरीत उडी घेतली. पाण्यावर तरंगणाऱ्या चार-पाच वर्षांच्या चिमुकल्याला त्यांनी सर्वप्रथम बाहेर काढले. त्यानंतर आणखी काही जणांना सुरक्षितरित्या बाहेर आणण्यात त्यांनी मदत केली.

इरफान मुजावर म्हणाले, “अपघात होताच किंचाळ्या सुरू झाल्या. त्या वेळी विचार करण्यास वेळ नव्हता. फक्त जीव वाचवणे महत्त्वाचे होते.” त्यांच्या या धाडसी कृतीमुळे अनेकांचे प्राण वाचल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, या दुर्घटनेत ८ भाविकांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *