नीट (NEET) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढीव गर्दीसाठी प्रवासी गाड्यांना अतिरिक्त सर्वसाधारण डबा जोडण्याचा निर्णय

रविवार दिनांक 21 जून रोजी होणाऱ्या नीट (NEET) परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच इतर प्रवाशांची संभाव्य वाढती गर्दी लक्षात घेऊन नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वेने काही निवडक प्रवासी गाड्यांना एक अतिरिक्त सर्वसाधारण (जनरल) डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांपर्यंत अधिक सोयीस्कर व आरामदायी प्रवास करता येणार असून प्रवाशांच्या वाढीव मागणीची पूर्तता होण्यास मदत होईल.
खालील गाड्यांना नमूद तारखांमध्ये एक अतिरिक्त सर्वसाधारण (जनरल) डबा जोडण्यात येणार आहे :
* गाडी क्र. 57651 हजूर साहिब नांदेड – मनमाड : 20 जून 2026
* गाडी क्र. 57652 मनमाड – हजूर साहिब नांदेड : 21 जून 2026
* गाडी क्र. 57653 पूर्णा – आदिलाबाद : 20 व 21 जून 2026
* गाडी क्र. 57654 आदिलाबाद – परळी वैजनाथ : 21 व 22 जून 2026
* गाडी क्र. 57655 परळी वैजनाथ – अकोला : 21 व 22 जून 2026
* गाडी क्र. 57656 अकोला – पूर्णा : 22 व 23 जून 2026
नांदेड विभाग , दक्षिण मध्य रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, सुलभ व आरामदायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नीट परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना अधिक चांगली सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने अतिरिक्त डबे जोडण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.



