सोनखेड हत्याकांड : कफायत अली यांच्या कुटुंबाला एमआयएमकडून २.५ लाखांची मदत

गेल्या काही दिवसांपूर्वी इंदिरा नगर, पीर बुरहान नगर येथील रहिवासी आणि व्यवसायाने प्लंबर असलेले कफायत अली यांची सोनखेड येथील एका पेट्रोल पंपावर किरकोळ कारणावरून काही समाजकंटकांनी निर्घृण हत्या केली होती. या दुर्दैवी घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही संतापाची लाट उसळली आहे.
आज All India Majlis-e-Ittehadul Muslimeen चे माजी राज्याध्यक्ष सय्यद मोईन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिवंगत कफायत अली यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच या कठीण काळात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पक्षाच्या वतीने मृताच्या कुटुंबाला २ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
या शिष्टमंडळात फिरोज खान लाला, कॉर्पोरेटर सय्यद मुजीब, अब्दुल हफीज, शमीम अब्दुल्ला, मसूद अहमद खान, मोहम्मद नासिर, मोहम्मद लतीफ लोखंडवाला, इरफान खान, मोहम्मद अल्ताफ, इमरान धोंडगे, रिजवान खान, सय्यद फसीउद्दीन, अन्सार खान आणि मोहम्मद सुहैल उर्फ गुड्डू यांचा समावेश होता.
यावेळी सय्यद मोईन यांनी सांगितले की, दिवंगत कफायत अली यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. तसेच All India Majlis-e-Ittehadul Muslimeen पीडित कुटुंबासोबत प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.



