शहर

नांदेडमध्ये निकृष्ट दर्जाच्या रस्ता व नाली कामाचा आरोप; चौकशीची मागणी

सावरीकर बिल्डिंग–नवघाट ब्रिज रस्ता कामावर प्रश्नचिन्ह

 

नांदेड, दि. १९ जून २०२६ – नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ (सद्य प्रभाग १३) मधील सावरीकर बिल्डिंग ते नवघाट ब्रिज दरम्यान करण्यात आलेल्या बी.टी. रोड व आर.सी.सी. ड्रेनेज कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद इरफानउल्ला यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्क ऑर्डर क्र. १५९२१/२०२५ दिनांक २८ मार्च २०२५ अन्वये सावरीकर बिल्डिंग ते नवघाट ब्रिजपर्यंत बी.टी. रोड आणि आर.सी.सी. नाली बांधकामाचे काम मे. अबचलनगर इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्यात आले होते. मात्र हे काम आजतागायत पूर्ण झाले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, ठेकेदाराने फक्त करबला कब्रस्तान येथील डी.पी. पर्यंतच काम केले असून त्यापुढील संपूर्ण भाग अपूर्ण आहे. तसेच रस्त्यावर आवश्यक मुरूम, माती व सिमेंट न टाकता केवळ सुमारे ०.२५ इंच जाडीचा डांबरी थर टाकण्यात आला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांवर फक्त आर.सी.सी. स्लॅब बसवण्यात आले असून प्रत्यक्ष नालीचे काम करण्यात आले नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जानेवारी ते मार्चदरम्यान तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर मे महिन्यापासूनच खड्डे पडण्यास सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. तसेच नाल्यांमध्ये कचरा साचत असल्याने ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे निकामी ठरत असल्याचा आरोप आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय संबंधित ठेकेदाराने काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने काम पूर्ण झाल्याचा ‘नो ड्यूज सर्टिफिकेट’ घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता काम पूर्ण झाल्याचे अहवाल सादर केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास न्यायालय, पोलीस प्रशासन किंवा इतर संबंधित कार्यालयांकडे दाद मागणार असल्याचा इशारा मोहम्मद इरफानउल्ला यांनी दिला आहे.

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *