जिला

स्वामित्व योजनेतून शाळांच्या मालमत्तेला मिळणार कायदेशीर कवच

जिल्ह्यातील शंभर मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

नांदेड, दि. २० जून-  जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे संरक्षण व कायदेशीर नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांच्या जागेचे स्वामित्व प्रमाणपत्र मिळविण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा जिल्हा परिषद नांदेडच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्साहात पार पडली.
     मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार माळोदे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील शंभर शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहभाग घेतला. स्वामित्व योजनेअंतर्गत शाळांच्या मालमत्तेची मिळकत पत्रिका क्रमांक प्राप्त करण्याच्या प्रक्रियेविषयी यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
     कार्यशाळेच्या प्रारंभी नांदेड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेचे स्वामित्व प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात तयार करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यामुळे शाळांच्या जागेची कायदेशीर नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणार आहे.
     यावेळी शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी शाळांच्या मालमत्तेची नोंदणी व संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भूमी अभिलेख विभागाचे खुडे, डाके आणि आशुतोष यांनी स्वामित्व प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व तांत्रिक बाबींविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
     कार्यशाळेस उपशिक्षणाधिकारी प्रज्ञा भवरे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, समग्र बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उबेद खान, जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी तसेच समग्र बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक राघवेंद्र मदनुरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन धनंजय गुम्मलवार यांनी केले. कार्यशाळेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेच्या नोंदणी प्रक्रियेला गती मिळणार असून शाळांच्या जागांचे हक्क व संरक्षण अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *