जिला

उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदल – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड दि. 21 जून :- यंदा जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला असून अद्याप आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागात उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा कॉलेज सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत 22 जून सोमवार पासून भरविण्यात येणार आहेत असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे.

त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या मराठी इंग्रजी उर्दू राज्य मंडळ सीबीएससी व इतर मंडळाच्या सर्व शाळा व्यवस्थापन यांनी याची नोंद घेऊन 22 जून 2026 सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळेचे वर्ग सकाळी आठ ते साडेबारा यावेळेत भरविण्यात यावेत असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *