भारतामध्ये पासपोर्ट बनवणे महाग; 1 जुलै 2026 पासून नवीन शुल्क लागू

भारतामध्ये पासपोर्ट बनवणे आता महाग होणार आहे. केंद्र सरकारने पासपोर्ट आणि ट्रॅव्हल डॉक्युमेंट्सच्या शुल्कात वाढ जाहीर केली असून नवीन दर 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहेत. नवीन शुल्कामुळे सामान्य तसेच तत्काळ (Tatkal) श्रेणीतील अर्जदारांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
18 वर्षांवरील नागरिकांसाठी नवीन शुल्क
सामान्य श्रेणीत नवीन किंवा रिन्यू पासपोर्टसाठी 2,500, तर तत्काळ सेवेसाठी 5,000 शुल्क आकारले जाईल.
60 पानांच्या पासपोर्टसाठी सामान्य शुल्क 3,500, तर तत्काळ शुल्क 6,000 असेल.
पासपोर्ट हरवल्यास किंवा खराब झाल्यास नवीन पासपोर्टसाठी सामान्य श्रेणीत 5,000 आणि तत्काळ सेवेत ₹7,500 मोजावे लागतील.
18 वर्षांखालील मुलांसाठी शुल्क वाढ
मुलांच्या नवीन किंवा रिन्यू पासपोर्टसाठी सामान्य शुल्क 1,750, तर तत्काळ शुल्क 4,250 असेल.
हरवलेल्या किंवा खराब झालेल्या पासपोर्टच्या पुनर्निर्मितीसाठी सामान्य शुल्क 4,250 आणि तत्काळ सेवेसाठी 6,750 निश्चित करण्यात आले आहे.
इतर प्रमाणपत्रांचे शुल्कही वाढले
PCC (Police Clearance Certificate), सरेंडर सर्टिफिकेट आणि ग्लोबल एंट्री प्रोग्राम व्हेरिफिकेशनसाठी 750 शुल्क आकारले जाईल.
Certificate of Identity साठी 1,000 शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
तर Emergency Certificate पूर्वीप्रमाणेच मोफत उपलब्ध राहणार आहे.
नवीन शुल्कवाढीमुळे परदेश प्रवासाची तयारी करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढ होणार आहे.



