देश विदेश

दक्षिण मध्य रेल्वेतर्फे हैदराबाद–जयपूर–हैदराबाद साप्ताहिक एक्स्प्रेसची सुरुवात

तेलंगणा, महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यांदरम्यान रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत रेल्वे मंडळाने गाडी क्र. 17079/17080 हैदराबाद–जयपूर–हैदराबाद साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. ही गाडी सध्या चालवल्या जाणाऱ्या हैदराबाद–जयपूर–हैदराबाद साप्ताहिक TOD विशेष गाडीचे नियमितीकरण म्हणून चालविण्यात येणार आहे.
या नव्या साप्ताहिक एक्स्प्रेसमुळे तेलंगाना, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

तसेच या मार्गावरील महत्त्वाच्या व्यावसायिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यटन स्थळांना उत्तम रेल्वे संपर्क मिळणार आहे.
गाडी क्र. 17079 हैदराबाद–जयपूर साप्ताहिक एक्स्प्रेस ही 24 जुलै 2026 पासून सुरू होणार असून, दर शुक्रवारी हैदराबाद येथून सायं. 19.50 वाजता सुटून रविवारी सकाळी 05.25 वाजता जयपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. 17080 जयपूर–हैदराबाद साप्ताहिक एक्स्प्रेस ही 26 जुलै 2026 पासून सुरू होणार असून, दर रविवारी जयपूर येथून दुपारी 15.30 वाजता सुटून मंगळवारी सकाळी 05.00 वाजता हैदराबाद येथे पोहोचेल.

ही गाडी पुढील प्रमुख स्थानकांवर थांबा घेईल:
• सिकंदराबाद जंक्शन, कामारेड्डी, निजामाबाद जंक्शन, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, मंदसौर, नीमच,चित्तौडगड जंक्शन, भिलवाडा, बिजयनगर, अजमेर जंक्शन, किशनगढ, फुलेरा, जयपूर जंक्शन गाडीची रचना

या गाडीत एकूण 22 एलएचबी डबे असतील. त्यामध्ये:
• 02 वातानुकूलित द्वितीय श्रेणी (AC 2-Tier) डबे, 07 वातानुकूलित तृतीय श्रेणी (AC 3-Tier) डबे, 07 शयनयान (Sleeper Class) डबे, 04 सामान्य द्वितीय श्रेणी डबे, 01 सामान व ब्रेक व्हॅन, 01 सामान-सह-गार्ड-सह-जनरेटर डबा
प्रवाशांना होणारे फायदे
या नियमित साप्ताहिक एक्स्प्रेसच्या सुरूवातीमुळे तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. या सेवेमुळे प्रवास अधिक सुलभ होईल, अतिरिक्त आरक्षण क्षमता उपलब्ध होईल तसेच पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळेल.
प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत चौकशी माध्यमांद्वारे सविस्तर वेळापत्रक आणि आरक्षणाची स्थिती तपासून घ्यावी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *