देश विदेश

टीसी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; नांदेडमध्ये विभागीय मेळाव्यात संरक्षणाची मागणी

 

नांदेड | प्रतिनिधी – रेल्वे प्रवाशांच्या सुविधा व सुरक्षेसाठी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या तिकीट तपासनीस (टीसी) कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांना आवश्यक संरक्षण व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय सिंग यांनी केली.

इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनच्या वतीने नांदेड येथील विभागीय कार्यालय परिसरातील सभागृहात दुसऱ्या विभागीय तिकीट चेकिंग कर्मचारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना संजय सिंग यांनी टीसी कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील अडचणी आणि सुरक्षेच्या समस्यांकडे लक्ष वेधले.

ते म्हणाले की, रेल्वेच्या विकासात तसेच प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यात तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा नियमभंग करणारे किंवा गुंड प्रवृत्तीचे प्रवासी टीसी कर्मचाऱ्यांशी वाद घालतात, धमकावण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकरणांमध्ये मोबाईलवर दिशाभूल करणारे व्हिडीओ तयार करून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे प्रकारही समोर येत असल्याने रेल्वे प्रशासनाने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

संघटना देशभरातील तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने काम करत असून, प्रलंबित मागण्यांसाठी शासन व रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी नांदेड विभागाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमास उपाध्यक्ष हेमंत वेदपाठक, राष्ट्रीय संयुक्त सचिव खालिद हुसेन, मंडल सचिव प्रदीप जोहरे, मंडल अध्यक्ष सय्यद लियाकत, विभागीय कोषध्यक्ष जी. महतो, यू. व्यंकटेशलू तसेच रेल मजदूर युनियनचे मंडल सचिव राम प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जी. महतो यांनी केले, तर किरण जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. मेळाव्यास विभागातील मोठ्या संख्येने तिकीट तपासनीस कर्मचारी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *