हेल्थ

राष्ट्रीय पल्स पोलिओ दिनानिमित्त चौफाळा ब्रह्मपुरी अंगणवाडीत लसीकरण मोहीम उत्साहात

 

चौफाळा ब्रह्मपुरी येथील अंगणवाडीमध्ये 28 जून 2026 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजण्यात आला. लहान मुलांना पोलिओसारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमावेळी श्रीराम सुंकेवार, मनीष झगडे, महेंद्र गायकवाड यांनी उपस्थित राहून मोहिमेस सहकार्य केले. तसेच अंगणवाडीच्या मुत्ते पवार मॅडम, सावते मॅडम आणि पारेकर मॅडम यांनी लसीकरण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

यावेळी पालकांनाही आपल्या पाल्यांना नियमित लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेमुळे बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *