सेवानिवृत्तीनिमित्त 2 लाख रु.चे साहित्य वाटप

परभणी:-(मोहम्मद बारी सर) तालुक्यातील पेगरगव्हान येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री.दत्तराव नवघरे 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले,उमरी केंद्रातील 9 जिल्हा परिषदेत शिक्षण घेणाऱ्या 1272 विध्यार्थ्यांना प्रत्येकी 150 रु चे साहित्य सेवानिवृत्ती निमित्त वाटप करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे,या कार्यक्रमाला परभणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.सुनील पोलास साहेब,शिक्षणाधिकारी योजना श्री.संजय ससाणे साहेब,
परभणी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री.उमेश राऊत साहेब,दैठणा संकुलाचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री.बालाजी मुंढे साहेब आणि उमरी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संतोष गव्हाणे,समस्त गावकरी आणि शिक्षकवृंद यांनी प्रयत्न केले.



