क्राईम

नायगाव घरफोडी प्रकरण दोन दिवसांत उघड; ९.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

नायगाव : नायगाव पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणत आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त बालिकेकडून ९ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांच्या पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली.

तपासादरम्यान फिर्यादीचा मुलगा शुभम कौठकर याच्यावर संशय आल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने धक्कादायक कबुली देत आपल्या मैत्रिणीच्या मदतीने घरफोडीचा कट रचल्याचे उघड केले. कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर जाणार असल्याची माहिती, घराच्या कुलूपाची अतिरिक्त चावी आणि घरात मोठी रोकड ठेवलेली असल्याची माहिती त्याने संबंधित बालिकेला दिली होती.

पूर्वनियोजित कटानुसार २६ जून २०२६ रोजी फिर्यादी कुटुंब घराबाहेर गेल्यानंतर संबंधित बालिकेने अतिरिक्त चावीच्या साहाय्याने घरात प्रवेश करून लोखंडी पेटीत ठेवलेली ९ लाख ७० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे चोरीतील ९ लाख ३६ हजार ६०० रुपये हस्तगत करण्यात आले.

या प्रभावी कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सदर कारवाईत सपोउपनि दारासिंग राठोड, पोहेका मोहन हाके, पोकॉ महेश बडगु, ब्रह्मानंद लामतुरे, शिलराज ढवळे, शितल सोळंके, लहू चाटे आणि आबाराव पिंगलवाड यांनी मोलाची भूमिका बजावली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *