जिला

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी विविध विभागांना दिल्या भेटी

 

नांदेड, दि. २ जुलै- नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी आज जिल्हा परिषदेच्या विविध विभागांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार तसेच संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, लेखा विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांना भेटी देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी कार्यालयीन स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक कार्यालय स्वच्छ, नीटनेटके व लोकाभिमुख असावे. तसेच कार्यालयीन परिसराची नियमित स्वच्छता राखावी, असे निर्देश त्यांनी दिले.
विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत व सुलभपणे मार्गी लावावीत. नागरिकांना कोणताही अनावश्यक त्रास होणार नाही, याची विभागप्रमुखांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून विभागांच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. कार्यक्षम, पारदर्शक आणि लोककेंद्रित प्रशासनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *