हेल्थ

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम भोकर येथे संपन्न

भोकर :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज दि. २८ जून रोज रविवारी ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भोकर शहरात राबविण्यात आली. नगराध्यक्ष श्रीमान भगवान दंडवे यांचे हस्ते हनुमान मंदिर येथील बूथवर बालकांना पोलिओ लस पाजवून मोहीम सुरुवात करण्यात आली.
जिल्हास्तरीय अधिकारी डॉ. विष्णू मलसेठवार यांनी ग्रामीण रुग्णालय भोकर येथील बूथ वर नुकतेच जन्मलेल्या बालकांना पोलिओ लस पाजविली व शहरातील बूथ यांना भेटी दिल्या.

वय ०-५ वर्ष वयोगटातील अपेक्षित लाभार्थी ४०१५ पैकी आज ३६९३ लाभार्थी यांना लस पाजविण्यात आली. भोकर शहरात आज २१ बूथ, ३ ट्रांझिट टीम व १ मोबाईल टीम द्वारे मोहीम राबविण्यात आली. सोमवार पासून पुढील ६ दिवस ८ टीम द्वारे आयपीपीआय (गृह भेटी) द्वारे भेट देऊन उर्वरित बालकांना लस पाजवीण्यात येणार आहे असे आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांनी सांगितले.
आज सदरील मोहीम मध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, हत्तीरोग कर्मचारी, नर्सिंग कॉलेज विध्यार्थीनी, स्वयंसेवक व ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *