जिला

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

नांदेड, दि. 2 जुलै 2026 : विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज अपर जिल्हाधिकारी नांदेड डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश कॉलनी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी त्यांनी मतदारांच्या घरी भेट देऊन मतदार गणना फॉर्म स्वतः भरून घेतले तसेच फॉर्मचे प्रत्यक्ष डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. SIR अभियान प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीदरम्यान तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपायुक्त, महानगरपालिका नितीन गाढवे उपस्थित होते. यावेळी सोमेश कॉलनी येथील मतदार सुभाषचंद्र लीलाधर शहा तसेच मतदार सौ. श्वेता सुनीलराव वट्टमवार यांनी मतदार गणना प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

पाहणीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ एम. एच. पवार, साहेबराव पांडुरंग जाधव तसेच बीएलओ पर्यवेक्षक श्री. ब्याले यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *