जिला

नांदेड शहरात नव्या अंगणवाड्या सुरू करण्याची मागणी; मुस्लिम से संघाचे निवेदन

 

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता विविध भागांमध्ये नवीन अंगणवाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी मुस्लिम से संघ महाराष्ट्रचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोहम्मद फेरोज हुसैन यांनी बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नांदेड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यानुसार बालक व महिलांसाठी आवश्यक सुविधा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः समिरा बाग, तहुरा बाग, देगलूर नाका परिसर तसेच प्रभाग क्रमांक २, ५, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७ आणि १८ या भागांमध्ये नवीन अंगणवाड्या सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या भागांमध्ये अंगणवाडी सुविधा उपलब्ध झाल्यास गोरगरीब कुटुंबांना मोठा लाभ होणार असून महिला व बालकांना आरोग्य, पोषण, शिक्षण तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सहज उपलब्ध होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सध्या ज्या भागांमध्ये अंगणवाडी सुविधा उपलब्ध नाही, त्या भागातील महिलांची नावे जवळच्या अंगणवाड्यांमध्ये समाविष्ट करून त्यांनाही बाल विकास प्रकल्प विभागामार्फत मिळणाऱ्या योजनांचा लाभ द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या मागणीमुळे नांदेड शहरातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *