जिल्हा परिषदेत स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नांदेड, दि. २२ जुलै : महाराष्ट्राचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित अनंतराव पवार यांची जयंती नांदेड जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प
संचालक तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. प्रवीणकुमार घुले, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर, महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



