जिला

राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कारासाठी शिवाजी गोडबोले यांची निवड

 

 

नांदेड,२४- प्रजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तथा भास्कर व्यायामशाळा व क्रीडा मंडळ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा- २०२६ अंतर्गत नांदेड येथील शिवाजी गोडबोले यांची प्रतिष्ठेच्या समाज भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नांदेड येथील डी.आर.एम. ऑफिस कॉम्प्लेक्स, येथे करण्यात आले आहे. या भव्य पुरस्कार सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती, शासकीय अधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. संस्थेने शिवाजी पांडुरंग गोडबोले यांचे अभिनंदन करत त्यांना कुटुंबीय, मित्रपरिवार व सहकाऱ्यांसह पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *