जिला

नांदेडमध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न; प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे यांचे मार्गदर्शन

 

नांदेड दि. 25 – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे यांच्या मराठवाडा दौर्‍याची सुरुवात 22 ऑगस्टपासून झाली आणि 24 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या दौर्‍याच्या निमित्ताने ते प्रथमच नांदेड येथे आले असता, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष फैसल सिद्दीकी यांच्या नेतृत्वात डॉक्टर लेन येथील पक्ष कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

दोर्‍याची सुरुवात
या बैठकीत नांदेड शहरातील विद्यार्थी आघाडीच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी पदाधिकार्‍यांनी एकजुटीने काम करण्याबाबत प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. मुजाहिद खान, राष्ट्रवादी किसान सभेचे लक्ष्मण भवरे, नांदेड अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शफी उर रहमान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना पोहरे, जिल्हा सरचिटणीस युनूस खान, युवक अध्यक्ष मनबीर ग्रंथी, युवक कार्याध्यक्ष पांडुरंग क्षीरसागर, तसेच अमित कांबळे, अमितसिंग सुखमणी, मो. अरसलान, युसुफ अन्सारी, मोहसीन खान, योगेश शिंदे, सूरज कदम, निखिल गायकवाड, प्रेम चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदेड शहरातील विद्यार्थी आघाडी अधिक सक्षम करून पक्षाची विचारधारा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे लढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *