जिला
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी परीक्षित यादव रुजू

नांदेड,२५- महाराष्ट्र विकास सेवा, गट-अ संवर्गातील परीक्षित दिलीप यादव यांना निवडश्रेणीतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदस्थापना करण्यात आली आहे.
ग्रामविकास विभागाच्या शासन आदेशानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार यादव यांनी सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन यादव यांचे स्वागत केले. यादव यांच्या प्रशासकीय अनुभवाचा लाभ जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांना आणि प्रशासकीय कामकाजाला मिळणार आहे.



