जिला

कृषी सेवा महासंघाचे शासनाविरोधात एल्गार; ३ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने कामबंद आंदोलनाची हाक- महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाचा आंदोलनाचा इशारा; उद्या राज्यभरात ‘लेखणी बंद’

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने तयार केलेल्या अपारदर्शक आणि अतांत्रिक प्रस्तावित आकृतीबंधाविरोधात महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या आकृतीबंधामुळे शेतकरी, कृषी विद्यार्थी व तांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप करत महासंघाच्या वतीने उद्या दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ पासून राज्यव्यापी ‘लेखणी बंद’ आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनामुळे राज्यातील कृषी विभागाचे सर्व अहवाल संकलन व प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. महासंघाने यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्र्यांकडे निवेदने देऊनही आणि कृषी महासंघाची कृषी आयुक्त यांच्या दि.२८ ऑगस्टच्या व सचिव कृषी यांच्या 31 ऑगस्ट च्या बैठकीत योग्य ती बाजू मांडूनही प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्याचे आक्षेप नोंदवत हे राज्यव्यापी तिव्र आंदोलन हाती घेतले आहे. व दिनांक 7/9/2026 रोजी सामूहिक रजा देऊन कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुका कृषी अधिकारी नांदेड संजय चातरमल, तंत्र अधिकारी पूनम चातरमल मॅडम, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप, दीपक नागुरे, उप कृषी अधिकारी विनोद देशमुख, सोनाली शिंदे, लक्ष्मण चचुवार,

सुप्रिया शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे वसंत जारीकोटे, तालुकाध्यक्ष दत्ता भुते, तालुका सचिव विजयकुमार पाटील, कार्याध्यक्ष बालाजी होणवडजकर, तालुका कोषाध्यक्ष कैलास पेरके, प्रल्हाद येवते, संभाजी वाघमारे,अश्विनी वासलवार,अर्चना मोरे, विनिता सर्वज्ञ, सलमा बेगम पाळेकर, माधुरी राजुरकर, सुरेखा शिंदे, सविता जारिकोटे, दिपाली मोरे, वनमाला मोरताडे, गंगासागर क्षीरसागर आदीसह सर्व तांत्रिक संवर्ग संघटनेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *