हेल्थ

श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वा निमित्त महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी घेतला लाभ

 

नांदेड /प्रतिनिधी -सिख धर्मियांचे पवित्र धर्मग्रंथ असलेल्या श्री गुरु ग्रंथ साहेब महाराज यांच्या पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त भारतीय जनता पक्षाचे सिख अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रमुख गुरदीपसिंघ संधू यांनी शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी गुरुद्वारा गेट नंबर 1 येथे आयोजित केलेल्या सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिराचा हजारों रुग्णांनी लाभ घेतला असून त्यांच्या या आयोजनाबद्दल आभार व्यक्त केले जात आहेत.

श्री गुरु ग्रंथ साहेब यांच्या पहिल्या प्रकाश पर्वाचे आयोजन शनिवार दि. 12 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे शीख सेलचे महाराष्ट्र प्रमुख गुरुदीपसिंघ संधू यांनी महाआरोग्य शिबिराचे आयोजन गुरुद्वारा गेट नंबर एक येथे केले होते. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष आणि श्री गुरु रामदासजी बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड बनवून दिले देण्यात आले. या महाआरोग्य शिबिरामध्ये सामान्य रुग्णांसह शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग, बालरोग, नेत्रविकार, स्त्रीरोग, दंतरोग, फिजिओथेरपी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराची सुरुवात हेड ग्रंथी स. सरबजितसिंघजी निर्मले यांनी अरदास करून केली. यावेळी मीत जत्थेदार संत बाबा रामसिंगजी, बाबा बलविंदरसिंघजी कारसेवाले यांच्यासह राज्यसभा खा. डॉ. अजित गोपछडे आ. अमर राजूरकर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वरजी नाईक, भाजपा डॉक्टर आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.सचिन उमरेकर गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक रविंदरसिंघ कपूर, सहाय्यक अधीक्षक जयमलसिंघ ढिल्लो, बलविंदरसिंग फौजी, रवींद्रसिंघ बुंगई, गुरमीतसिंघ महाजन, भागींदरसिंघ घडीसाज, जगदीपसिंघ नंबरदार, महेंद्रसिंघ लांगरी, जसबीरसिंघ धुपिया, हरविंदरसिंघ कपूर, सुखविंदरसिंघ हूंदल, राजासिंघ फौजी, गुरप्रीतसिंघ सोखी, हरप्रीतसिंघ पुजारी, पवितसिंघ आरतिया, मनप्रितसिंग हूंदल यांनी परिश्रम घेतले

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *