हेल्थ

डेंग्यू प्रतिबंधासाठी गावागावात स्वच्छता उपाययोजना प्रभावीपणे राबवा

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचे आवाहन

 

नांदेड,२४- ग्रामीण भागात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता विषयक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी दिले आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्याचे योग्य संकलन व विल्हेवाट तसेच घरगुती आणि सार्वजनिक परिसरात पाणी साचू न देण्यावर विशेष भर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक स्वच्छता उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायत क्षेत्रातील घरगुती व सार्वजनिक ठिकाणांमधील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून कुठेही डबकी किंवा पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घरांच्या व सार्वजनिक परिसरातील कचरा, टाकाऊ वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, टायर, डबे आदींमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी नियमित स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डेंग्यू प्रतिबंधासाठी नागरिकांमध्येही व्यापक जनजागृती करावी. पाणी साचू देऊ नका, डासांची उत्पत्ती होऊ देऊ नका हा संदेश घराघरात पोहोचवून नागरिकांचा स्वच्छता उपक्रमांमध्ये सहभाग वाढवावा. सांडपाणी व घनकचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होणारी संभाव्य ठिकाणे शोधून त्यांचे निर्मूलन करण्यावर ग्रामपंचायतींनी विशेष लक्ष द्यावे.
यासाठी ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन आणि आरोग्य विभागाच्या यंत्रणांनी समन्वयाने काम करून डेंग्यू प्रतिबंधाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांनी केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *