क्राईम

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची अहमदपूर येथे कारवाई

घरावर छापा टाकून १ लाख १६ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त

 

नांदेड (मुनवर खान) : नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पाठविण्यात आलेल्या पथकाने अहमदपूर तालुक्यातील उगिलेवाडी येथे कारवाई केली. १५ सप्टेंबर रोजी एका घरावर छापा टाकून १ लाख १६ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी सुधीर सूर्यकांत बेंबडे व अतुल सूर्यकांत बेंबडे (रा. उगिलेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांच्याविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ६१४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे, गणेश राठोड व गजानन डवरे यांच्या पथकाने केली. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.

अवैध व्यवसायांची माहिती ‘खबर’ हेल्पलाइनवर द्या

नांदेड परिक्षेत्रातील नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. यासाठी ‘खबर’ हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी ९१५०१००१०० या क्रमांकावर माहिती द्यावी.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *