मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड, १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक महेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. गिरी, प्रशांत थोरात, अमित राठोड, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे जिल्हा आयुक्त एस.बी. खुणे, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, कृषी अधिकारी डॉ निलकुमार ऐतवडे, कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब, खराडे, यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्माकर कुलकर्णी व मिलिंद व्यवहारे यांनी केले.



