मराठवाडा

सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धेत बहिरगाव प्रशालेचे घवघवीत यश

 

बहिरगाव : जिल्हा परिषद प्रशाला बहिरगाव, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत वैष्णवी गणेश बनकर (इयत्ता ९ वी) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक, तर अमृता कैलास बनकर (इयत्ता ९ वी) आणि शरयू राधेश्याम दापके (इयत्ता ८ वी) यांनी तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच विद्या रमेश बनकर (इयत्ता ७ वी) आणि राजनंदिनी जगदीश बनकर (इयत्ता ५ वी) यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले.

यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र तसेच विज्ञान विषयाचे साहित्य भेट म्हणून देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचा बहिरगावचे सरपंच डॉ. केशव शिरसे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन कौतिकराव पवार, रवींद्र बनकर, ग्रामसेवक योगेश धाटबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब घोलप आणि केंद्रीय मुख्याध्यापक विजय पोतदार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांना गणेश बल्हाळ, ,स्वप्नील गांगुर्डे, राधेश्याम शर्मा, रवींद्र ठाकरे श्रीमती किसनाबाई गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल मुख्याध्यापक भाऊसाहेब घोलप तसेच शिक्षक दिलीप महाजन, कुलभूषण व्यवहारे, श्रीमती नूतन पवार, श्याम खोसरे, सलीम आतार, श्रीमती किरण पाटील व श्रीमती सविता कुंटे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. .

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *