शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आजचा हा लढा!

आज छत्रपती संभाजीनगर येथे पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने झालेल्या ‘तुमसे ना हो पायेगा’ या जनआंदोलनात सहभागी होत सरकारच्या शेतकरीविरोधी आणि जनविरोधी कारभाराविरोधात माझी भूमिका मांडली.
आज खऱ्या अर्थाने हा लढा शेतकरी आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. सरकारने सगळीकडून जनतेची ‘त्राही माम’ अशी अवस्था करून ठेवली आहे.
माझ्या परभणी जिल्ह्यात गेल्या ४५ दिवसांपासून पावसाचा थेंब नाही. शेतकरी अक्षरशः होरपळून निघाला आहे. मात्र अद्याप दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणीदेखील झालेली नाही. मराठवाड्यासाठी वेगवेगळ्या कामांच्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात कामांची प्रगती अत्यंत नगण्य आहे. परभणी जिल्ह्यातील अनेक विकासकामे निधीअभावी रखडलेली आहेत. शासन दरबारी आणि विधानसभेत सातत्याने आवाज उठवत असतानाही निधी रोखला जात आहे.
सगळीकडे केवळ भ्रष्टाचार आणि सत्तेचा माज दिसत आहे. १५ दिवसांपासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता, तरी त्यांना भेटणार नाही, अशी वक्तव्ये सरकारमधील मंत्री करत होते. हा सत्तेचा माज जनता उतरवून टाकल्याशिवाय राहणार नाही.
उद्धवसाहेब आपण मुख्यमंत्री असताना कोणतीही अट न ठेवता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. कोरोना काळात महाराष्ट्र सरकारच्या कामाची देशासह जगाने दखल घेतली. संकटाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला आधार देण्याचे काम उद्धवसाहेबांनी केले.
आज पुन्हा महाराष्ट्रातील जनतेची आशा उद्धवसाहेबांकडे आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय देणारे सरकार आपल्याला उभे करायचे आहे.
आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे आमची स्पष्ट मागणी आहे.
– तात्काळ दुष्काळ जाहीर करा.



