मराठवाडा

विविध बोलींनी हिंदी भाषा समृद्ध होत गेली: डॉ. प्रकाश निहलानी 

पीपल्स कॉलेजमध्ये हिंदी दिन उत्साहात; हास्य-व्यंग्य रचनांनी रंगला कार्यक्रम

नांदेड, २० सप्टेंबर- भारतातील विविध प्रदेशांमध्ये हिंदी वेगवेगळ्या स्वरूपात बोलली जाते. स्थानिक बोलींमधील अनेक शब्द हिंदीने आत्मसात केल्याने लोकांच्या वापरातून हिंदी भाषा सातत्याने समृद्ध होत गेली, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बहिःस्थ शिक्षण विभागाचे संचालक तथा हास्य-व्यंग्य कवी डॉ. प्रकाश निहलानी यांनी केले.
     नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने पीपल्स कट्ट्यावर हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास सुकाळे होते. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
     हिंदी ही भारताची बिंदी आहे, असे सांगत डॉ. निहलानी यांनी विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा अभिमान बाळगत हिंदीसह अन्य भारतीय भाषांचाही अभ्यास करावा, असे आवाहन केले. त्यांनी नदी और सागर का मिलाप, डॉक्टर को देखने का समय यांसह हास्य-व्यंग्य रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. फौजी और अनपढ़ लड़की या सादरीकरणालाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
     सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी मराठी माझी आई आहे, तर हिंदी माझी मावशी आहे,असे सांगत सर्व भारतीय भाषांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी हिंदी कविता तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेले गीत सादर केले. प्राचार्य डॉ. विकास सुकाळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
     हिंदी दिनानिमित्त विद्यार्थिनींनी हिंदीतील प्रथम महिला साहित्यिकांची माहिती देणारे भित्तिपत्रक सादर केले. तसेच सायबर गुन्ह्यांवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. राजेश्वरी अन्नदाते, ज्योती जोगपेठे व प्रांजली जवळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
     डॉ. आम्रपाली कसबे यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एन. जाधव यांनी केले. डॉ. माया भालेराव यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन डॉ. आम्रपाली कसबे यांनी तर आभार प्रा. विजय कदम यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास प्रा डॉ. मुकुंद कवडे, प्रा डॉ. सुनिता माळी, प्रा डॉ. पुनम लोहाना, प्रा डॉ. राजेश सोनकांबळे, प्रा. कल्पना जाधव, डॉ. मिर्झा, डॉ. आनंद थोरात, प्रा. पी. पी. चौधरी, प्रा. जी. डी. तडोड, प्रा. डॉ. विनोद चव्हाण, प्रा. डॉ. विनायक देव, प्रा. किरण बीचकुंदे, प्रा. आदित्य गोडबोले, डॉ. सुप्रिया गायकवाड, डॉ. वर्षा मोरे, प्रा डॉ. प्रीती यादव तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *