जिला

सैनिक फेडरेशनचा मराठवाडास्तरीय मेळावा उत्साहात

 

मुदखेड तालुका प्रतिनिधी : मोहम्मद हकीम – नांदेड : सैनिक फेडरेशनचा मराठवाडास्तरीय मेळावा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष, माजी खासदार तथा सेवानिवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी निंबाळकर, मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे, नांदेड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील डूमणे यांच्यासह विविध तालुक्यांचे प्रमुख पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील व शहरातील आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात सैनिकांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सैनिकांच्या प्रश्नांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ घेऊन लवकरच चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सुधीर सावंत यांनी दिली.

दरम्यान, येत्या डिसेंबर महिन्यात मुंबई येथे महाराष्ट्रस्तरीय सैनिकांचा महामेळावा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले. या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना सुधीर सावंत व निंबाळकर यांनी आवश्यक सूचना दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन सैनिक फेडरेशनचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील डूमणे आणि मुदखेड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *