जिला

दिव्यांगांच्या हक्कासाठी १ व २ ऑक्टोबरला गांधीगिरी आंदोलनाचा इशारा

१०६ दिव्यांगांना ५% निधी द्या; पात्र दिव्यांगांना BSUP घरकुलांचे समान वाटप करा

 

 

नांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेकडील दिव्यांगांसाठी राखीव ५% निधीपैकी उर्वरित निधी अद्याप १०६ दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही. याबाबत वारंवार भेटी घेऊन निवेदने व विनंत्या करूनही प्रश्न प्रलंबित असल्याने सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन, नांदेड व संलग्न बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या वतीने दि. १ व २ ऑक्टोबर २०२६ रोजी गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या आंदोलनांतर्गत शेकडो दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत मनपा आयुक्त कार्यालयासह संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या दालनांच्या परिसरात शांततामय स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. दि. १ ऑक्टोबरपूर्वीच १०६ दिव्यांगांच्या खात्यात उर्वरित ५% निधी वर्ग करून प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच तेहरानगर साईट नं. ३४ येथील BSUP अंतर्गत शिल्लक घरकुलांचे ज्या पद्धतीने अंध दिव्यांग लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे रीतसर अर्ज दाखल केलेल्या मूकबधिर/कर्णबधिर दिव्यांगांसह उर्वरित सर्व पात्र दिव्यांगांना कोणताही भेदभाव न करता समान व न्याय्य पद्धतीने घरकुले वितरित करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सदर आंदोलन शांततामय, अहिंसक व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास किंवा घडवून आणल्याची तक्रार झाल्यास, त्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधित व्यक्ती अथवा जबाबदार अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शांततामय आंदोलनात अनावश्यक अडथळे निर्माण झाल्यास उपलब्ध कायदेशीर व लोकशाही मार्गाने अधिक व्यापक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

सर्वसमावेशक दिव्यांग सशक्तीकरण असोसिएशन, नांदेडचे व संलग्न बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *